वापरण्यास दिलेली दुचाकी परस्पर विकली

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : ऑनलाईन सामानाची डिलेव्हरी करण्याच्या कामासाठी आलेल्या तरूणाला डिलेव्हरी बॉयच्या कामासाठी ई कार्टच्या वेंडरने दुचाकी दिली. डिलेव्हरी बॉयने काही दिवस दुचाकीचा वापर करून ही दुचाकी परस्पर विक्री करून ई कार्ट वेंडरला चुना लावला. ही घटना २ जुलै २०२५ रोजी सकाळी ८ ते १४ जुलै २०२५ दरम्यान घडली. दुचाकी चोरीला गेल्याचा बनाव डिलेव्हरी बॉयने केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मोहम्मद साबीर पटेल (रा. लाखोली, नाचनखेडा, ता. जि. जळगाव) असे आरोपीचे नाव आहे. 
या प्रकरणात मुश्ताक सांडु पठाण (वय ३३, रा. गल्ली नंबर २०, जमजम हायस्कूल जवळ, सादातनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुश्ताक पठाण हे ई कार्ट वर येणार्‍या लोकांचे सामान वितरण करणार्‍या एजन्सीमध्ये वेंडर म्हणुन काम करतात. त्यांच्याकडे साबेर पटेल हा काम करण्यासाठी आला. 
दुचाकी नसल्याने साबेर पटेल याला दुचाकी (एमएच १५ एफडब्ल्यु ७९१३) दिली. या दुचाकीवर काही दिवस काम केल्यानंतर ही दुचाकी चोरी झाल्याची माहिती साबेर पटेल याने दिली. यानंतर एके दिवशी त्याने दुचाकी चोरी झाल्याची माहिती दिली. दुचाकीचा मुश्ताक पठाण यांनीही शोध घेतला. मात्र दुचाकी सापडली नाही. सदर वाहन साबेर पटेल याने परस्पर विकून विश्वासघात केल्याचे मुश्ताक पठाण यांना खात्री झाली. 
या प्रकरणी मुश्ताक पठाण यांच्या तक्रारीवरून फसवणूक करणार्‍या साबेर पटेल याच्या विरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार प्रदीप डहाके करीत आहेत.